भक्ती वाचून मुक्तीची
मज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी
ज्ञानेशाचे अमृत अनुभव,
अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव,
विले त्यांत कधी विठ्ठला
संत तुक्याची अभंगवाणी,
इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी,
करुणेचा हा निधी विठ्ठला
सरले शिश्नाव स्वच्छंदीपण,
नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन,
तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला