विठ्ठल आवडी प्रेमभाव

विठ्ठल आवडी प्रेमभाव,
विठ्ठल नामाचा रे टाहो,
तुटला हा संदेहो,
भवमूल व्याधिचा....

म्हणा नरहरि उच्चार,
कृष्ण हरि श्रीधर,
हेंचि नाम आम्हां सार,
संसार तरावया...

नेघों नामाविण कांहीं,
विठ्ठल कृष्ण लवलाही,
नामा म्हणे तरलों पाहीं,
विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि विठ्ठल....

श्रेणी
download bhajan lyrics (498 downloads)