एक वेला करी या दु:खा वेगले

एक वेला करी या दु:खा वेगले
दुरिताचे जाले ऊगओनि
आठवीण पाय हा माझा नवस

रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस

बहु दुरवरी भोगविले भोग
आता पान्डुरंगा सोडवावे
आठवीण पाय हा माझा नवस

तुकाम्हणे काय करिन कुरवंडी
वोवाळुनी सान्डी मस्तक हे
आठवीण पाय हा माझा नवस

रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस

श्रेणी
download bhajan lyrics (781 downloads)