शंभोसुता लंबोदरा (गणेश स्तवन)

शंभोसुता । लंबोदरा
गणनायका । विघ्नेहरा
मांगल्य जे । असते जगी
स्त्रवते सदा । अपुल्या करा ॥

तिमिरातुनी । दुरितास या  
द्या मुक्तता । प्राणेश्वरा
तेजातुनी । तेजाकडे
बुद्धीस ने । दुर्वांधरा ॥

सामिप्य द्या । द्या साधुता
सायुज्य द्या । या पामरा
परते करा । दुस्वास या
उजळा त्वरे । भू - अंबरा ॥


गीत : डॉ मिरदेव गायकवाड
संगीत : अरुण सराफ

A 'Lotus Feet Melodies' creation
श्रेणी
download bhajan lyrics (1722 downloads)