साजिरे गोजिरे सुंदर हासरे,॥
देवा तुझे मुख ,
गजाचे वदन द्विजाचे तन कसे हे अप्रूप ||
गोंडस गोलाई ,तुझ्या उदराची,
मोतिया तकाकी ,लोभस भुजांची
बुद्धीचा स्वामी तू तरी निरागस , || तुझे बाळरूप ||
साजिरे गोजिरे सुंदर हासरे
देवा तुझे मुख ,
गजाचे वदन द्विजाचे तन कसे हे अप्रूप
पावलात नाचे , नर्तनाची वीज ,
काव्यनाटकांची , चाले गजबज,
तुझिया भवती , ललितकलांचा ,|| दरवळे धूप ||
साजिरे गोजिरे सुंदर हासरे
देवा तुझे मुख ,
गजाचे वदन द्विजाचे तन कसे हे अप्रूप
आबालवृद्धांना ,मोह पडे तुझा
विघ्ने निवाराया , नाही कोणी दुजा
सृष्टीची पुष्टी तू , आहारविहारी ||, तुष्टी तू अमूप ||
साजिरे गोजिरे सुंदर हासरे,॥
देवा तुझे मुख ,
गजाचे वदन द्विजाचे तन कसे हे अप्रूप ||