कान्हा ओ कान्हा कान्हा रे कान्हा
नंदकिशोरा, चित्तचकोरा गोकुळतारा, मनमोहन तू
बावरी राधा मी ब्रिजबाला
प्रेम रसाची ओढ जीवाला
कृष्ण कन्हैया अशी
लाविसी तू नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
कृष्णा कृष्णा, हरे कृष्णा
राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा
वृंदावनी गोप-गौळणी घेऊनिया धुंद रास खेळसी
तू पानांतुनी वेलीतुनी
बासुरीचे गोड छेडीसी तू
याच सुरांनी मोहुनी
गेले पाहुनी तुजला मी तुझी
झाले वेड मनाला असे लाविसी
तू नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
राधा तुझी, मीरा तुझी
होईन मी श्याम तुझी
दासी रे प्रीती अशी, भक्ती अशी
लाभली ही आज मधुमासी रे
तूच मुकुंदा माधव माझा
मुग्ध मनाचा श्रीहारी
राजा लोचनी माझ्या असा राहसी
तू नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
बावरी राधा मी ब्रिजबाला
प्रेम रसाची ओढ जीवाला
कृष्ण कन्हैया अशी
लाविसी तू नंदकिशोरा, चित्तचकोरा
गोकुळतारा, मनमोहन तू
कृष्णा कृष्णा, हरे कृष्णा
राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा