पाहीन लोचने भरुनी,
म्हणता भरुन लोचने आली,
सजल नयने रूप पाहू मी कैसे ,
रंग तुझा कधी रे घननीळा ,
कधी सावळा , कधी रे काळा
वाजविसी मुरली कान्हा (कैसे) ,
कर कटेवरी ठेवोनी ,
संगे धनुर्धर अनुज दिसे मज,
कधी दिसे तो गदाधर अग्रज,
वामे शोभे सीता माई कि रखुमाई माउली ,
मिटून लोचने नमुनी माथा ,
मुखी नामाचा गजर करिता
रूप तुझे हृदयात प्रगटले धन्य धन्य माउली ,
सजल नयने रूप पाहिले ऐसे पाहिले लोचने भरुनी ,
गीत - संगीत : अरुण सराफ
गायिका : कार्तिकी गायकवाड