आज आनंद सोहळा

|| पंढरीची वारी - एक आनंद सोहळा ||

आज आनंद आनंद, आज आनंद सोहळा
भक्ती भावानं फुलून येईल भक्तांचा हा मळा

क्षण सुखात का रंगला, मोह मायी कसा गुंतला
दुःखानं जीव खंगला , अन झाला लुळा पांगळा
विसरुनी जाऊ सारी चिंता, लावू हरीचा लळा

अभंगाच तोरण बांधुन, अनंताच करू पूजन
भजनात भान हरपुन, मन येईल आनंदुन
राम हरी नाम घेऊ, देऊ साद विठ्ठला

          गीत : अरुण सराफ
       संगीत : अरुण सराफ
       गायक : सुरेश वाडकर
      अल्बम : हृदयी रहा रे दयाघना
श्रेणी
download bhajan lyrics (1420 downloads)