विठ्ठल विठ्ठल बोला

|| विठ्ठल विठ्ठल बोला , बोला पांडुरंग ||

विठ्ठल विठ्ठल बोला , बोला पांडुरंग॥
दणाणून टाकू सारा आसमंत ॥  

जना मनातून आज भक्ति जागवूया
हरी चरणी सारे भाव अरपूया
   ज्योत पेटवूया मंद मंद
   विठ्ठल विठ्ठल बोला , बोला पांडुरंग॥

कारे प्रपंचाचा ध्यास तुला भाग्यवंता
अवघ्या संसाराची चिंता आहे भगवंता
   परमसत्य परमेश्वर तोचि कृपावंत
   विठ्ठल विठ्ठल बोला , बोला पांडुरंग॥

लागता लळा नामाचा - विठ्ठल विठ्ठल 
उद्धार करील अमृताचे बोल
   बाभळीस येईल चंदनाचा गंध
   विठ्ठल विठ्ठल बोला , बोला पांडुरंग॥

        गीत    : अरुण सराफ
       संगीत  : अरुण सराफ
        गायक : रवींद्र साठे
       अल्बम : हृदयी रहा रे दयाघना
श्रेणी
download bhajan lyrics (1641 downloads)