हृदयी रहा रे दयाघना
मन:शांती दे मन मोहना
चरणी तुझ्या ही प्रार्थना ||
तू जाणसी, कि अजाण मी ,
जगतो परी निष्प्राण मी
प्राणेश्वरा, करुणाकरा ,
संजीवनी दे जीवना ||
हृदयी रहा रे दयाघना ...
लय ताल स्वर झंकार तू,
श्वासातला ओमकार तू
वर पामरा दे श्रीधरा,
अखंडित राहो स्वराधाना ||
हृदयी रहा रे दयाघना ...
गीत : अरुण सराफ
संगीत : अरुण सराफ
गायक : सुरेश वाडकर