चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट,
पुण्याचा सोनार बोलवा ग,
आईला नथनि घडावा ग,
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट
एकविरीची पाहत होते वाट ,
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट ,
ठाण्याचा कासार बोलवा ग,
आईला बांगड्या भरा ग ,
लिंब ग नारळाच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट,
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट ,
रायगड चा लोहार बोलवा ग,
आईला त्रिशूल घडावा ग,
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट,
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट ,