कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
असा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा

परब्रम्ह हे भक्तासाठी
उभे ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु कि पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा

श्रेणी
download bhajan lyrics (801 downloads)