श्री गणराया बाप्पा मोरया

श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया,
राह आम्हावर माया र,
राह आम्हावर माया र,
दरवर्षाला भक्त गणाला,
या वे दर्शन दयाला र,
श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया...

घरा घरात अंगणात मंडपात बैसला,
बाल गोपाला आनंद झाला त्यात सेवेना चला,
तुझीच स्फुर्ती बेधुंद धरती,
जीवन हे फुल वाया र,
श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया...

भोवाई चिंता हरली आता प्रसन्न धरती झाली,
सुख संपदा आरोग्य नांदे इडा पिडा ती टळली,
तू कन वालू दिन दयालू,
धरी कृपेची छाया र,
श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया...

तुझीच काया, तुझीच माया, तुझीच किमया सारी,
तुझाच दास, तुझाच ध्यास, भक्तिच्या संसारी,
दुःखी जनांचे गुणी जनांचे,
सुरते मन राम व्हाया र,
श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया...

मागणे हेच उरले आता गणराया तुझ पाशी,
मागणे हेच उरले आता गणराया तुज पाशी,
मागणे हेच उरले आता गणराया तुज पाशी,
भाव दुर्वा हि अर्पण कर्तो सेवा तव चरणाशी,
तुला स्मरितो वंदन करितो,
धांवुन ये शुभ कार्य र,
श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया...

राह आम्हावर माया र,
राह आम्हावर माया र,
दरवर्षाला भक्त गणला,
या वे दर्शन दयाला र,
श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया,
श्री गणराया बाप्पा मोरया....
श्रेणी
download bhajan lyrics (398 downloads)