पाहता पाहता, पहाटेची झाली सांज
ढोलकीची विरली थाप , कानी किणकिणली झांज
झुंजू मुंजू बालपणाचे, रंग कोवळे निर्मळ
गेले हास्य ते लडिवाळ, दिस येता यौवनात
कोटी कोटी किरणांनी, जरी व्यापिले जीवन
परि प्रकाशले मन, तेवता ही सांज वात
कैसा मृगजळाच्या पाठी, व्यर्थ संपला प्रवास
आहे ईश्वराचा वास, सदा तुझ्या अंतरात
गीत-संगीत : अरुण सराफ
गायक : सुरेश वाडकर
अल्बम : हृदयी रहा रे दयाघना