मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला..... भक्तासाठीं तो जगजेठी, कुब्जेसी रत जाला, मनमोहन मुरलीवाला.... विदुरा घरच्या भक्षुनि कण्या, परमानंदें धाला, मनमोहन मुरलीवाला.... भक्तिसुखें सुखावला, एका जनार्दनीं निमाला, मनमोहन मुरलीवाला.....