येई हो विठ्ठले माझे माऊली ये

येई हो विठ्ठले माझे माऊली ये,
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे,

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप,
पंढरपुरी आहे माझा मायबाप,

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला,
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला,

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी,
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ,

श्रेणी
download bhajan lyrics (706 downloads)