मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

बालपणी होते माझे मन हे अजाण
तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान
वृद्धपण येता आली जागती महान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

पतितांना पावन करते दया तुझी थोर,
भीक मागतो मी चरणी,
अपराधी घोर अपराधी घोर
क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण
मिळे ज्याने मुक्ती ऐसे....

श्रेणी
download bhajan lyrics (1750 downloads)